Maharashtra Assembly Session 2025: राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. विरोधी पक्षाशी सामना करताना महायुती सरकारला पावसाळी अधिवेशन जड जाण्याची चिन्हे आहेत.
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर राज्यात पहिलीपासून हिंदीसक्तीचा विषय तापला. हिंदीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी याचे पडसाद उमटणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून नेण्यास जिल्ह्यातील मंत्र्यांचाच विरोध आहे. हा विरोध डावलून महामार्गाचे काम रेटण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे अधिवेशनात या महामार्गाच्या उपयुक्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारची कोंडी करू शकतात.
भाजपचं ठरलं! प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या जागी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती, किरण रिजिजू निरीक्षक, १ जुलैला घोषणा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना निधी देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या पैशांवर मारलेला डल्ला यावरून विरोधी पक्ष सरकारचे वाभाडे काढण्याची संधी सोडणार नाही.
Satbara Utara: 7/12 संदर्भात मोठी अपडेट, 1 ऑगस्टपासून ऑफलाइन सुविधा बंद, असा करावा लागेल अर्ज
या मुद्द्यांवर अधिवेशन गाजण्याची शक्यता…
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
मे, जून महिन्यातील पावसाचा मुंबई, पुण्यातील जनजीवनाला बसलेला फटका
पुण्यात तळेगावजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून पर्यटकांचा झालेला मृत्यू
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा सुरू असलेला गोंधळ

