Murder Case Update: वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे आश्रमात राहणाऱ्या महिला कीर्तनकाराची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली. शेजारील कुटुंबाने वाळू आणल्याच्या कारणावरून वाद घातला होता, अशी माहिती वडिलांनी दिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानुसार पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून कसून चौकशी सुरू आहे.
वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची शुक्रवारी रात्री दगडाने ठेचून हत्या झाली. मोहटादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले. त्यावेळी आश्रमाचे कुलूप गेट तोडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन प्रवेश केला असता संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अधिकारी कर्मचारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
Bharat Gogavale : ‘नारायण राणे यांनी मर्डर अन् भानगडी केल्यात’; निलेश राणेंसमोरच भरतशेठ बोलता-बोलता भलतंच बोलून गेले
अमृताच्या वडिलांचा संशय
कीर्तनकार संगीता पवार यांच्या हत्येने राज्यभरात एकच खळबळ उडाली. ही हत्या कोणी व का केली असे प्रश्न निर्माण झाले असताना मृत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही 2007 मध्ये चिंचडगाव मध्ये दीड एकर जमीन घेतली. तेव्हापासून शेजारचं कुटुंब आमच्याशी वाद घालत होते. त्यानंतर ही जमीन मी मुलगी संगीता हिला दिली. संगीता या जमिनीवर आश्रम बांधणार होती. त्यासाठी जमिनीवर वाळू आणण्यात आली. यावेळी शेजारील कुटुंबाने वाद घातला. 14 एप्रिल रोजी विरगाव पोलीस ठाण्यात शेजारच्या चौधरी कुटुंबाच्या विरोधात तक्रार दिली. माझ्या मुलीला धोका असल्याचा देखील उल्लेख केला होता. त्यानंतर माझ्या मुलीची हत्या झाल्याचं वडील अण्णासाहेब पवार म्हणाले.
दरम्यान, मृताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार देखील पोलीस तपास करत असून या प्रकरणांमध्ये चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील यामध्ये स्वतः लक्ष घालून आरोपीचा शोध घेत आहेत.

