ठाकरे गटाला खिंडार! विलास शिंदेचा आज शिवसेनेत प्रवेश
शिवसेना ठाकरे गटातून उचलबांगडी झाल्यानंतर माजी महानगरप्रमुख विलास शिंदे आज (दि. २९) शक्तिप्रदर्शन करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर सहा माजी नगरसेवक, चार जिल्हापरिषद सदस्य, सहा माजी पंचायत समिती सदस्यांसह संघटनेतील अनेक पदाधिकारीही प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ठाकरेसेनेला पुन्हा मोठे खिंडार पडणार आहे.
