• Sat. Mar 14th, 2026

    मुंबईतील चिमुरडीने मोबाईल तोंडात घातला, दम लागला, खोकला वाढला; डॉक्टरांकडे जाताच समजलं…

    मुंबईतील चिमुरडीने मोबाईल तोंडात घातला, दम लागला, खोकला वाढला; डॉक्टरांकडे जाताच समजलं…

    Dharavi Girl Swallows LED light : मुलीला घेऊन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात आले. त्यावेळी त्या चिमुरडीला श्वास घ्यायला त्रास होत होता. दमही लागत होता. सतत खोकला येत होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : लहान मुले खेळण्याच्या नादात तोंडात काहीही घालतात. ती वस्तू पोटात गेली तर काय होऊ शकते, याचे गांभीर्य त्यांना नसते. असाच एक प्रकार मुंबईतील धारावी भागात राहणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुकलीने केला. खेळण्यातील मोबाइल तिने तोंडात घातला. त्यावेळी त्यातील छोटा एलईडी लाइट तिच्या श्वसनलिकेत गेला. डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करून ही वस्तू बाहेर काढल्यामुळे त्या मुलीचे प्राण वाचले.

    नेमकं काय झालं?

    कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. शशिकांत म्हशाळ यांनी त्यांच्या टीमसह ही शस्त्रक्रिया केली आहे. धारावी येथे राहणारे या मुलीचे पालक घाबरले. या मुलीला घेऊन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात आले. त्यावेळी त्या चिमुरडीला श्वास घ्यायला त्रास होत होता. दमही लागत होता. सतत खोकला येत होता.

    डॉक्टर काय म्हणाले?

    डॉ. म्हशाळ यांनी तत्काळ काही चाचण्या, एक्स-रे केल्यानंतर तिने काही वस्तू गिळली असून ती श्वासनलिकेत गेल्याचे निष्पन्न झाले. गिळलेला हा एलईडी लाइट काढण्यासाठी एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही वस्तू श्वास नलिकेत अडकली होती. त्याला पुढे असलेला एलईडी बल्ब आणि त्याला दोन तारा जोडल्या होत्या.
    Nashik News : मुंबईहून नाशिकला जाताना काचेवर पाणी उडालं, भरधाव मर्सिडीज उलटली, सुप्रसिद्ध बिल्डरचा मृत्यू

    …तर मुलीचा जीव धोक्यात

    ही वस्तू तत्काळ बाहेर काढली नसती तर त्या मुलीच्या जिवाला धोका होता. ‘मुले खेळताना पटकन काही वस्तू तोंडात टाकतात. यापेक्षाही धोकादायक म्हणजे ते झोपून एखादी वस्तू खातात. त्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. त्यामुळे त्यांच्या जीवावर बेतू शकते. झोपून काही गिळल्यास ते श्वासनलिकेत जाऊन अडकते. हा धोका अधिक वाढतो’, असे यासंदर्भात माहिती देताना डॉ. म्हशाळ यांनी सांगितले.

    Mumbai News : मुंबईतील चिमुरडीने मोबाईल तोंडात घातला, दम लागला, खोकला वाढला; डॉक्टरांकडे जाताच समजलं…

    Pune Crime : दुसऱ्या लग्नानंतरही दोघांशी अनैतिक संबंध, दुसऱ्या बॉयफ्रेण्डने नको त्या अवस्थेत पाहिलं अन् संपवलं, पुण्यात डोक्याला मुंग्या आणणारी स्टोरी

    भूल तज्ज्ञांची जबाबदारीही मोलाची

    एन्डोस्कोपिक पद्धतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी भूलतज्ज्ञांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची होती. यावेळी भूलतज्ज्ञ डॉ. रत्नाकर गोसावी, सहाय्यक सर्जन मायाशंकर आणि डॉ. अमृता तटंक यांनी मोलाचे वैद्यकीय सहकार्य केले, असेही डॉ. म्हशाळ यांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed