• Sun. Mar 8th, 2026

    दोघांमध्ये जवळपास 4 ते 5 तास चर्चा

    ByMH LIVE NEWS

    May 18, 2025
    दोघांमध्ये जवळपास 4 ते 5 तास चर्चा

    मुंबई – अनुप फंड

    20 जून रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार असून आयपीएल संपताच टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लड सिरीज पासून भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या सायकलमध्ये सुरुवात होणार आहे. भारताचा टेस्ट कर्णधार आणि स्टार फलंदाज राहिलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता त्यांच्या जागी कोणत्या खेळाडूंना टीम इंडियात स्थान दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 23 मे रोजी इंग्लड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात येऊ शकते.

    मात्र त्यापूर्वी भारतीय टेस्ट संघाच्या नव्या कर्णधाराबाबत मोठी अपडेट समोर आलीये. PTI ने दिलेल्या रिपोर्टनुसार शुभमन गिल हा पुढील भारतीय टेस्ट संघाचा कर्णधार होऊ शकतो. मागील काही दिवसांमध्ये टेस्ट कर्णधार म्हणून गिल सह ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह इत्यादींची नावं चर्चेत होती. पीटीआयच्या माहितीनुसार शुभमन गिल याने भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीर याची दिल्लीमध्ये भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास 4 ते 5 तास चर्चा झाली. त्यानंतर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर भारतीय टेस्ट संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलच्या नावावर मोहर लावण्याची शक्यता आहे.  

    मागील काही दिवसांपासून भारतीय टेस्ट संघाचा कर्णधार म्हणून स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचं नाव सुद्धा समोर येत होतं. तसेच बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान बुमराहने रोहितच्या अनुपस्थितीत संघाचं यशस्वीपणे नेतृत्व केलं. तसेच तो उपकर्णधार सुद्धा होता. रिपोर्ट्सनुसार बोर्डचे काही अधिकारी शुभमन गिलला टेस्ट संघाचा कर्णधार बनवण्यास तयार नाहीत. परंतु तरीही शुभमन गिलकडेच भारतीय टेस्ट संघाच कर्णधारपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. 

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed