• Fri. Sep 18th, 2026

नवऱ्याशी फारकत, तिशीच्या महिलेचे विशीतील तरुणाशी सूत, तिसऱ्याची एन्ट्री, अखेर दोघांनी मिळून…

नवऱ्याशी फारकत, तिशीच्या महिलेचे विशीतील तरुणाशी सूत, तिसऱ्याची एन्ट्री, अखेर दोघांनी मिळून…

Woman life taken by Two Boyfriends : दोन प्रियकरांनी मिळून प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीतून समोर आली आहे.

(फोटोLipi)

महेश गुंडेटीवार, गडचिरोली : प्रेमाच्या त्रिकोणातून झालेला वाद शिगेला पोहोचला. अखेर दोन प्रियकरांनी मिळून प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे 14 मे रोजी ही खळबळजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. प्रमोद जाडी आणि समय्या दुर्गम हे दोन्ही आरोपी अटकेत असून त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

मृत 30 वर्षीय रिता हिला (नाव बदललेले) एक मुलगा, एक मुलगी असून ती पतीपासून विभक्त झालेली आहे. तिची दोन्ही मुले वडिलांकडे वास्तव्यास आहेत, तर ती माहेरी कोत्तापल्ली येथे आईकडे राहायला आहे. प्रमोद मलय्या जाडी (20, रा. नडीकुडा) याच्याशी तिचे प्रेम होते. नंतर तिच्या आयुष्यात समय्या बालय्या दुर्गम (30, रा. कोत्तापल्ली) याचीही एंट्री झाली. यातून वाद वाढला. रिताच्या आईच्या फिर्यादीवरुन असरअल्ली ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला.
Pune Crime : मसाज पार्लरच्या नावाखाली अश्लील प्रकार, पुण्यात बापलेकाला बेड्या, स्पाय कॅमने व्हिडिओ बनवत…

कॉल न घेतल्याने राग

13 मे रोजी प्रमोद जाडी याने रिताला वारंवार फोन केला, पण तिने कॉल घेतला नाही. इकडे समय्या दुर्गम हा देखील ती प्रतिसाद देत नसल्याने रागात होता. तिची आई मोठ्या लेकीकडे हैद्राबादला गेली होती. त्यामुळे रिता घरी एकटीच होती. यावेळी त्या दोघांनी मिळून रिताचा गळा दाबून काटा काढला.

Gadchiroli Crime : महाराष्ट्र हादरला! नवऱ्याशी फारकत, तिशीच्या महिलेचे विशीतील तरुणाशी सूत, अचानक तिसऱ्याची एन्ट्री, दोघा प्रियकरांनी मिळून तिचा…

एसपी नीलोत्पल, एएसपी यतीश देशमुख, सत्यसाई कार्तीक, उपअधीक्षक संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय समाधान दौड व सहकाऱ्यांनी तपासचक्रे गतिमान करुन दोघांना अटक केली.
Pune Crime : चाकण अत्याचार प्रकरणात विवाहित तरुणाला अटक, निर्लज्जपणे म्हणतो, नाईट शिफ्टवर रस्त्याने जाताना ती दिसली आणि…

पत्नीचा खून करून पुण्यात पतीची आत्महत्या

दुसरीकडे, कर्जबाजारीपणाला कंटाळून पुण्यातील घाऊक फळ विक्रेत्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वाघोलीत घडला. वाघोलीतील मांजरी खुर्द परिसरात ही घटना घडली. नागनाथ वसंत वारूळे, वय 42, आणि उज्ज्वला नागनाथ वारूळे, वय 40, अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभवआणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed