• Thu. Sep 10th, 2026

श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधीस ‘अ वर्ग’ दर्जा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 15, 2025
श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधीस ‘अ वर्ग’ दर्जा – महासंवाद




मुंबई, दि. १५: श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जि. सोलापूर या तीर्थक्षेत्रास विशेष बाब म्हणून तीर्थक्षेत्राचा ‘अ वर्ग’ दर्जा या बाबतचा शासन निर्णय ग्राम विकास विभागामार्फत १३ मे २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मान्यता देण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिखर समितीची बैठक घेण्यात आली होती. या शिखर समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, या तीर्थक्षेत्रास ‘अ’ वर्ग देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार या बाबतचा शासन निर्णय ग्राम विकासाने निर्गमित केला असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक २०२५०५१३१४४५०९०५७७२० असा आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed