• Thu. Mar 12th, 2026

    वेगाने केला घात, बाईक अन् कारच्या भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कारचालक गंभीर

    वेगाने केला घात, बाईक अन् कारच्या भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; कारचालक गंभीर

    Edited byअक्षय शितोळे | Contributed by सुशील राऊत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 May 2025, 10:32 am

    Chhatrapati Sambhaji Nagar Accident: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद-फुलंब्री रस्त्यावर भीषण अपघात झाला. एका दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने वाल्मीक देवकर नावाच्या १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

    अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: दूध डेअरीकडून शेताकडे जात असताना मागून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून कारचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खुलताबाद ते फुलंब्री रस्त्यावर येसगाव नंबर एक येथे घडली. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वाल्मीक संतोष देवकर (राहणार किनगाव, तालुका फुलंब्री) असं अपघातात मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे.

    या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मीक देवकर हा येसगाव नंबर एक येथील दूध डेअरीवर गेला होता. या दूध डेअरीवरून तो शेताकडे दुचाकी (क्र. एमएच २० डी २९२८) ने जात होता. काही अंतरावर जाताच पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारणे वाल्मीक याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीचा चुराडा झाला तर कार खड्ड्यात जाऊन पडली. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील वाल्मीक व चार चाकी चलक गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तात्काळ वाल्मीक याला फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

    वाल्मिकीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर गंभीर जखमी असलेल्या कारचालकाला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    दरम्यान, या भीषण अपघाताप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed