• Sat. Mar 7th, 2026
    सोनं नेलं, तक्रार केली, मग मागे का घेतली? वानवडी पोलिसांवरील आरोपांमुळे निर्माण झाला संभ्रम

    Pune Crime News : कर्नाटकातील बल्लारी येथे सराफा व्यवसायिकासोबत पोलिसांनी दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. सराफा व्यावसायिक कपिल मफतलाल जैन यांनी पुण्यातील वानवडी पोलिसांवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. यावरून वानवडी पोलिसांविरुद्ध दंडात्मक कारवाई झाली पण अचानक त्यांनी तक्रार मागे घेतली.

    (फोटो– Lipi)

    पुणे : कर्नाटकातील बल्लारी येथे सराफा व्यवसायिकासोबत पोलिसांनी दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. सराफा व्यावसायिक कपिल मफतलाल जैन यांनी पुण्यातील वानवडी पोलिसांवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. जैन यांच्या म्हणण्यानुसार, चोरीच्या प्रकरणाच्या तपासाच्या नावाखाली पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्यातील चार अंमलदारांनी त्यांच्याकडून २७ तोळे सोने जबरदस्तीने घेतले आहे. यावरून वानवडी पोलिसांविरुद्ध दंडात्मक कारवाई झाली, मात्र यानंतर जैन यांनी अचानक आपली तक्रार मागे घेतल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

    घटना १८ डिसेंबर २०२४ रोजी घडली होती. चोरट्याने गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या चौकशीसाठी पुण्याहून पोलिस बल्लारी येथे गेले होते. तिथे पोलिसांनी जैन यांना धमकावत, ‘तुझ्याकडे अजून १०० तोळे सोने आहे, जे कोयता गँगकडून घेतले आहे,’ असा आरोप करत २७ तोळे सोने घेतल्याचे सांगितले जाते.
    Satara News : मोठी बातमी! नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रग्स इंजेक्शनच्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईचा शिकाऊ डॉक्टर अडकला
    यानंतर जैन यांनी पोलीस आयुक्त व वानवडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. यावरून पोलिसांवर केवळ ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. मात्र त्याच दरम्यान जैन यांनी स्वतःच तक्रार मागे घेतली. यानंतर जैन यांनी पोलीस आयुक्त व वानवडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. यावरून पोलिसांवर केवळ ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. मात्र त्याच दरम्यान जैन यांनी स्वतःच तक्रार मागे घेतली.

    या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवलेलाच नव्हता, तर मग तपासाच्या नावाखाली सराफाच्या दुकानातून सोनं का नेण्यात आलं? आणि तक्रारदारानेच तक्रार मागे का घेतली? हे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed