• Wed. Mar 11th, 2026

    बालपणी मामाने लग्न लावलं, संसार करताना घराबाहेर पडण्याची वेळ, 81 वर्षांनी पुनर्विवाह

    बालपणी मामाने लग्न लावलं, संसार करताना घराबाहेर पडण्याची वेळ, 81 वर्षांनी पुनर्विवाह

    Nashik Couple remarriage : संतोषबाबा भामरे (वय ८५) आणि जाईबाई आहेर (८३) या दाम्पत्याची ही कहाणी समाजातील उणिवा अन् जाणिवा अधोरेखित करणारी आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    नाशिक : रुढी-परंपरेनुसार ‘त्यांचा’ ८१ वर्षांपूर्वी बालविवाह झालेला.. अनेक चढ-उतारांचा सामना करीत दोघांनी संसाराचा गाडा चालवला. एकुलत्या मुलाचे लग्न लावले अन् नंतर दोघांनाही घराबाहेर पडावे लागले. मोठ्या हालअपेष्टांनंतर ‘त्यांना’ आधाराश्रमात दाखल केले गेले. आता तेथेच ‘त्यांचा’ ८१ वर्षांनंतर होणारा पुनर्विवाह कुतूहलाचा विषय बनला आहे.

    संतोषबाबा भामरे (वय ८५) आणि जाईबाई आहेर (८३) या दाम्पत्याची ही कहाणी समाजातील उणिवा अन् जाणिवा अधोरेखित करणारी आहे. घर सोडल्यानंतर मंदिर, फूटपाथवर त्यांना जीवन व्यतित करावे लागले. त्यांच्या यातना बघून एका सजग महिलेने त्यांना आधाराश्रमापर्यंत पोहोचविले.

    विशेष म्हणजे दीड वर्षापासून ही जोडी नांदुरी (ता. कळवण) येथील ज्या सप्तशृंगी आधाराश्रमात राहत आहे तेथील संचालकांनी ८१ वर्षांनंतर येत्या १८ मे रोजी त्यांचे पुन्हा एकदा लग्न अर्थात, पुनर्विवाह लावण्याचे ठरविल्याने या जोडीसोबतच इतर घटकांतही या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे कुतूहल दिसून येत आहे. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात वाजंत्री, मांडवावेळी स्नेहभोजन, हळदीचा कार्यक्रम, मंगलाष्टके व इतर पूजाविधी, तसेच वधू-वरांची रथ मिरवणूक आणि अगदी फोटोग्राफरची व्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे.
    Bunyan ul Marsoos : डरपोक पाकड्यांची ‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात आगळीक, मोहिमेचं नाव ठेवलं ‘बुनयान उल मरसूस’, अर्थ वाचून हसाल
    संतोषबाबा हे चार वर्षांचे आणि जाईबाई अवघ्या दोन वर्षांच्या असताना तत्कालीन रुढीनुसार ८१ वर्षांपूर्वी संतोषबाबांच्या मामाने आपल्या भाच्याशी जाईबाई यांचा बालविवाह करविला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात असे बालविवाह होत आणि आयुष्यभर टिकतही असत. आता सप्तशृंगी आधाराश्रमातील दत्तकपुत्र वर संतोषबाबा (खुंटेवाडी, ता. देवळा येथील स्व. सुकदेव भावडू भामरे यांचे चिरंजीव) आणि वधू जाईबाई (निवाणे, ता. कळवण येथील स्व. वेडू तानाजी आहेर यांची कन्या) यांचा होणारा पुनर्विवाह चर्चेचा विषय बनला आहे.

    Nashik News : ठरलं तर मग! बालपणी मामाने लग्न लावलं, संसार करताना घराबाहेर पडण्याची वेळ, 81 वर्षांनी जोडप्याचा पुनर्विवाह

    Nandurbar News : भावाच्या लग्नासाठी सुट्टीवर, कॉल आला अन् CRPF जवान भारतमातेच्या सेवेस रवाना, देशभक्तिपर गाणी लावत गावाकडून मिरवणूक

    तथ्य दडवून पोटगी मिळवण्याचा प्रयत्न

    दुसरीकडे, न्यायालयाने पोटगी मंजूर केली असतानाही ती बाब लपवून ठेवत २५ हजार रुपयांची अंतरिम पोटगी मागणाऱ्या पत्नीचा अर्ज पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने फेटाळला. उच्चशिक्षित असलेल्या आणि नामांकित फायनान्स कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या पत्नीने आपल्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याचे सांगून पतीकडून अंतरिम पोटगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्याचा आदेश कौटुंबिक न्यायाधीश एस. बी. यादव यांनी दिला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed