Nandurbar CRPF Jawan on leave returns on duty : भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. नंदुरबार येथील सुपुत्र असलेले केंद्रीय सुरक्षाच्या दलातील जवान किशोर भगवान माळी यांनाही तात्काळ सैन्य दलाने बोलविले.
नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात राहणारे किशोर भगवान माळी केंद्रीय सुरक्षा दलात कार्यरत आहेत. त्यांच्या काकांचा मुलगा प्रकाश श्रावण माळी याचे 14 तारखेला लग्न होते. त्यामुळे किशोर माळी हा जवान लग्नासाठी सुट्टी घेऊन आठ मे रोजी रात्री उशिराने नंदुरबार येथे दाखल झाला.
Murali Naik : देशाचं रक्षण करताना तुमचा सुपुत्र शहीद, अधिकाऱ्यांचा फोन, आई कोसळली; मुरली नाईक यांना अखेरचा निरोप
भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. नंदुरबार येथील सुपुत्र असलेले केंद्रीय सुरक्षाच्या दलातील जवान किशोर भगवान माळी यांनाही तात्काळ सैन्य दलाने बोलविले. भावाच्या लग्नाअगोदरच सैन्य दलाने बोलविताच त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत जवान किशोर माळी हे देश सेवेसाठी तात्काळ सीमेवर नऊ मे रोजी रात्री लगेच रवाना झाले. घरात लग्नाचे वातावरण सुरू असताना, लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना जवान सीमेवर भारत मातृभूमीच्या रक्षणासाठी निघाला.
Bunyan ul Marsoos : डरपोक पाकड्यांची ‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात आगळीक, मोहिमेचं नाव ठेवलं ‘बुनयान उल मरसूस’, अर्थ वाचून हसाल
डीजेचा तालावर सैनिकाला केले रवाना
भारत व पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. भारतातर्फे ऑपरेशन सिंदूर राबविण्यात येत आहे. मात्र पाकतर्फे वेगवेगळ्या कुरापती सुरू आहेत. भारतीय सेना पाकला सडेतोड उत्तर देत आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार येथील सुपुत्र जवान किशोर माळी हे भावाच्या लग्नासाठी आले असताना त्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ते गावाकडे आल्यानंतर काही तासातच युद्धासाठी रवाना झाले. ते नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात राहतात. तेथील नागरिकांनी डीजेवर देशभक्तीपर गीते लावत मोठ्या संख्येने उपस्थित राहत जवानाला रवाना केले.

