Solapur News : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मनीषा माने यांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली. मनीषा माने या पूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. माने यांच्या जामीन अर्जावर १४ मे रोजी सुनावणी होणार आहे.
राज्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाने मन सुन्न झाले होते. मनीषा माने यांना सोलापूर पोलिस ताब्यात घेऊन शनिवारी किंवा मंगळवारी कोर्टात हजर करतील अशी माहिती मनीषा माने यांचे वकील ऍड प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे.
उकाड्याने हैराण, घरात डोळा लागेना, नातू अंगणात झोपला, पण मध्यरात्री…; घटनेनं सांगोल्यात खळबळमनीषा मानें सध्या न्यायालयीन कोठडीत, पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी-
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली होती.१९ एप्रिल रोजी रात्री सोलापूर शहर पोलीस दलातील सदर बाजार पोलिसांनी मनीषा माने यास ताब्यात घेत तपास सुरू केला होता. मनीषा माने डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी पदावर अनेक वर्षांपासून कार्यरत होत्या.
पोलिसांनी यापूर्वी पाच दिवस पोलीस कोठडीत मनीषा मानेंकडून वेगवेगळ्या अँगलने तपास केला होता. मनीषा माने सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तपास करण्यासाठी मनीषा मानेची पोलीस कोठडीची मागणी केली.
डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात मोठी अपडेट, पोलीसांची कोर्टाकडे विनंती
१४ मे रोजी जामीन अर्जासाठी कोर्टात करणार अर्ज
मनीषा माने यांचे वकील ऍड प्रशांत नवगिरे यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही सेशन कोर्टात मनीषाच्या जामीनासाठी अर्ज ठेवणार आहोत. यापूर्वी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता, परंतु सरकार पक्षाचे म्हणणे कोर्टासमोर आले नव्हते. १४ मे रोजी मनीषा मानेंच्या जामीन अर्जावर सेशन कोर्टात सुनावणी होणार आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

