Pune News : महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. शरद पवार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना, हा विषय केवळ राजकीय नाही, तर कौटुंबिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
आळंदी येथे एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी सांवाद साधला. यावेळी रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांच्या वयाचा आणि तब्येतीचा विचार करता, पक्षातील निर्णय प्रक्रियेत सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. “पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, पण त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. सुप्रिया ताई नव्या पिढीच्या नेत्या असून, त्यांना कार्यकर्ते आणि आमदारांचे मत माहिती आहे. कोणताही निर्णय पक्षाची अधिकृत बैठक घेऊन, सर्वांची मते जाणून घेतल्यानंतरच होईल.”
Pune BJP : निवडणुका समोर दिसताच भाजपचा ‘एकला चलो’चा नारा, निवडणुकीपूर्वीच महायुतीत मिठाचा खडा?मला सात वर्ष झाले राजकारणामध्ये, माझ्यापेक्षा ४० ते ५० वर्ष आधी भुजबळ साहेब राजकारणात राहिले आहेत. आणि आणि पक्षांत काम केलं आहे. पवार साहेब अजित दादाना ते फार जवळून ओळखतात, त्या दृष्टिकोनातून राजकीय ओळख आणि एकत्र काम केल्यामुळे त्यांनी ती इच्छा व्यक्त केली असेल. शेवटी हा पार्टीचा जसा विषय आहे तसा कुटुंबाचा सुद्धा आहे.
त्यामुळे सुप्रियाताई आणि अजित दादा हे कुटुंब असल्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया ताई चर्चा करतील. सर्व आमदार, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना विचारात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असेही रोहित पवार यांनी सांगितले. थोडक्यात काय तर भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर नवल वाटायला नको.

