Sanjay Lele Son on Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने अत्यंत समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे. जिथून आतंकवादी निघतात, त्या 9 जागांना टार्गेट केलेलं आहे, अशाच आणखी कारवाया व्हाव्यात ही इच्छा त्याने बोलून दाखवली
काय म्हणाला हर्षल लेले?
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने अत्यंत समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे. जिथून आतंकवादी निघतात, त्या 9 जागांना टार्गेट केलेलं आहे, अशाच आणखी कारवाया व्हाव्यात ही इच्छा आहे, यांना पूर्ण नेस्तनाबूत करुन टाकलं पाहिजे. एक हजाराहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पाहिजे, अशी इच्छा हर्षल संजय लेले याने बोलून दाखवली.
Operation Sindoor : कुंकवाचा करंडा अन् शौर्याचं प्रतीक, पहलगाम हल्ल्याचा सूड, ‘ऑपरेशन सिंदूर’ नावामागे कारण काय?
‘बाबांना शांती मिळाली असेल’
या घटनेमुळे बाबांना शांती मिळाली असेल, हे बघून आम्हालाही बरं वाटलं. बाबा, माझे दोन्ही मामा आणि इतर 26 जणांनाही शांती मिळाली असेल. माझे बाबा देशासाठी मृत्युमुखी पडले. पाच वर्षांपूर्वी पुलवामा हल्ल्याचा सरकारने सूड घेतल्यानंतर माझ्या बाबांनी मला मिठी मारली होती, म्हणजेच त्यांना देशाची खऱ्या अर्थाने काळजी होती, त्यामुळे ते निश्चितच आनंदी असतील, अशा भावनाही हर्षल लेले याने व्यक्त केल्या.
Harshal Lele : बाबांना शांती मिळाली असेल, पहलगाम हल्ल्यात मृत संजय लेलेंचा लेक गहिवरला, पुलवामा हल्ल्यानंतर वडिलांनी मला…
आमचा मामा फक्त बोलत होता की आम्हाला जाऊ द्या, त्याला काहीही दया न दाखवता थेट गोळी घातली, माझ्या दुसऱ्या मामासोबत आणि मग माझ्या बाबांसोबत तेच घडलं, त्यामुळे ऑपरेशन सिंदूर म्हणून त्यांनी केलेल्या एअरस्ट्राईकचा आम्हाला आनंद झाला आहे, असंही हर्षल लेले पुढे म्हणाला.
Pragati Jagdale : आम्ही मोदींच्या लेकी, वडिलांनी न्याय मिळवून दिला; डोळ्यादेखत कुंकू पुसलं गेलं, ऑपरेशन सिंदूर नाव ऐकताच रडू कोसळलं, प्रगती जगदाळेंच्या भावना
माझी सरकारला एक विनंती आहे, की भारतावर पुन्हा एखादा हल्ला होण्याची वाट पाहत बसू नये, दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवून हा विषय संपवून टाकला पाहिजे, हा भारतावरचा शेवटचा हल्ला पाहिजे, असंही हर्षल म्हणाला.

