Pune Crime News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. राकेश निसार नावाच्या व्यक्तीने पत्नी बबिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो मृतदेह दुचाकीवरून विल्हेवाट लावण्यासाठी निघाला होता. पोलिसांनी त्याला भूमकर पुलाजवळ पकडले. आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. नांदेड सिटी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
आरोपी पती राकेश रामनायक निसार हा रात्री दीड वाजता भूमकर पुलाकडून राकेश बायकोची बॉडी घेवून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला ठोकल्या बेड्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मयत पत्नीचे नाव पत्नी बबिता राकेश निशार असे आहे. नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला प्रकार घडला आहे. दोघा पती-पत्नीमध्ये नेमकं काय झालं होतं? आरोपी पती राकेश निसार याने आपल्या पत्नीला नेमक्या कोणत्या कारणामुळे संपवलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.
Pune News: पाठलाग केला, घरात घुसला, नऊ वर्षांच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी अन्… पुण्यात संताप
दरम्यान, आरोपी राकेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वामीनारायण मंदिराकडे जाण्याचं ठरवलं होतं. स्वामीनारायण मंदिराजवळ रात्रीसुद्धा काही प्रमाणात लोकं पाहायला मिळतात. विशेष म्हणजे राकेश दुचाकीवरून पत्नीचा मृतदेह घेऊन जात होता, त्याला भीत वाटली नाही? त्याच्या डोक्यात नेमकं काय शिजत होतं याबाबत पोलीस दुपारी सविस्तर माहिती देतील. अद्याप खूनाचे कारण समोर आले नाही. मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

