Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारीचे दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. पुण्यातील भररस्त्यात गुन्हेगारीचा थरार अनुभवायला मिळाला आहे. हातात कोयता घेऊन तरुणांच्या एका गटात तुफान हाणामारी झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार आणि सतीश पवार या चार तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे पुण्यातील सराईत गु्न्हेगार आहेत. यांनी यापूर्वीही अशाप्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या गुन्हेगारीचा रेकॉर्ड पाहून पोलिसांनी विशेष तपास सुरु केल्याचेही सांगण्यात आले.
दिव्यांगाचा अपघाती अंत न् 51 लाखांचा पॉलिसी क्लेम; 9 महिन्यांनी सत्य समोर, एजंटसह चौघे गजाआड
सीसीटीव्ही फुटेजमुळे हल्ल्याची भीषणता समोर
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी बिवडेवाडी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले आहेत. यामध्ये दिसून येतेय की, तरुणांच्या एका गटात भररस्त्यात तुफान हाणामारी सुरु आहे आणि एकाने हातात कोयता घेऊन दुसऱ्या तरुणावर तो उगारला आहे. यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पुणे पोलिसांनी अटक आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले. गुन्हेगारीचा रेकॉर्ड लक्षात घेता कोर्टाने आरोपी भिसे आणि पवारसह सगळ्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेमागील नेमकं कारण काय? यासंदर्भात पोलीस सखोल तपास करत आहेत. आरोपींच्या मोबाईल तपासणी केली जात आहे, जेणेकरुन त्यांचा कोणत्या टोळीशी संबंध आहे का, हे तपासात समजू शकेल.

