• Sat. Mar 7th, 2026
    विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज, मराठवाड्यातही अवकाळी

    Maharashtra Weather Forecast : राज्यात हवामानात बदल होत आहेत. हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मुंबई आणि कोकणात उकाडा वाढला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी उष्णता दिसतंय. दुसरीकडे होळीनंतर उष्णता वाढण्याचे संकेत असताना तापमानात घट झाली आणि राज्यात अवकाळीचे सावट बघायला मिळाले. राज्यातील अनेक भागांमध्ये धुवाधार अवकाळी पाऊस झालाय. काही ठिकाणी गारपिट देखील झाली. काही शहरांमध्ये उष्णता वाढताना दिसली. पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे देखील गेला. मात्र, आता परत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

    मे महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज

    एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात अनेक भागात पाऊस झाला. आता मे महिन्याला सुरूवात झालीये आणि भारतीय हवामान खात्याकडून पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरीचा इशारा देण्यात आलाय. विदर्भात चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावती, वाशिम आणि बुलढाण्यात ढगांच्या गडगडाटासह विजांसोबत पावसाचा अंदाज आहे.
    दारू पिताना मस्करी सुरू, अचानक झाला वाद अन् थेट काढला मित्राचाच काटा, पुण्यात खळबळ काही शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे

    धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना या भागात देखील हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागात रविवारी पावसाचा अंदाज आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. एकीकडे वाढणारी उष्णता आणि दुसरीकडे पावसाला पोषक असे वातावरण बघायला मिळतंय.

    विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा थेट इशारा

    विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आलेला असतानाच अकोल्यात आज ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीये. मुंबईमध्ये दुपारच्यावेळी उष्णता वाढताना दिसली. कोकणात देखील उकाडा वाढला आहे. पुण्यात तापमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. गारपिटीमुळे नाशिकमध्ये फळ बागांचे मोठे नुकसान झाले. भर उन्हाळ्यात सातत्याने पाऊस पडताना दिसतोय. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची देखील शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे हवामानातील उष्णता वाढू शकते.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed