Pune News : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे एका दिव्यांग व्यक्तीची दारू पिताना झालेल्या शिवीगाळामुळे हत्या करण्यात आली. पोलिसांनी पाच तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. गणेश रवींद्र सोनावणे असे मृत तरुणाचे नाव असून, सिद्धेश रेणुके आणि विघ्नेश शेवाळे या आरोपींना 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दारू पिताना वाद गेला टोकाला आणि मित्रांनी केली हत्या
आरोपी सिद्धेश संतोष रेणुके आणि विघ्नेश अशोक शेवाळे या दोघांना न्यायालयाने 3 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंचर परिसरात असणाऱ्या महात्मा गांधी विद्यालय व अण्णासाहेब आवटे महाविद्यालय भागात सोमवारी रात्री उशिरापर्यंत दिव्यांग गणेश हा सिद्धेश आणि विघ्नेश या मित्रांसोबत दारू पित बसला होता.
Pune News: विहिरीशेजारी बाईक, डोकावून पाहताच लहान भावाची बॉडी दिसली, तलाठ्याच्या मृत्यूने गावात शोककळापोलिसांनी अवघ्या पाच तासांमध्ये आरोपींच्या आवळल्या मुसक्या
यादरम्यान मस्करीत गणेश याने सिद्धेश आणि विघ्नेश यांना शिवीगाळ केली. त्यामुळे या दोघांनी दारूच्या नशेत आणि रागाच्या भरात सिद्धेश रेणुके याने दारूची बाटली फोडली आणि गणेशवर सपासप वार केले. यानंतर गणेश सोनवणे हा जागेवर कोसळला त्यातच त्याचा मृत्यू झाला. खून झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
दिव्यांग व्यक्तीचा खून झाल्याने शहरात उडाली मोठी खळबळ
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सूत्र हलवत अवघ्या पाच तासात आरोपींना अटक केली. दिव्यांग व्यक्तीचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत या खुनातील आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांना 3 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या खून प्रकरणात पोलिसांकडून अधिकचा तपास हा केला जातोय. आरोपींची चाैकशी केली जाईल.

