Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये ४ दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पर्यटकांची संख्या जास्त आहे. पहलगाममध्ये असलेल्या बैसरण खोऱ्यात फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला.
केंद्रीय गृह मंत्रालयानं आदेश दिल्यानंतर राज्यातील प्रशासन कामाला लागलं. राज्य सरकारनं शोध मोही हाती घेतली. यातून समोर आलेली आकडेवारी चिंताजनक आहे. राज्यातील ४८ शहरांमध्ये ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. यातील केवळ ५१ जणांकडे वैध कागदपत्रं आहेत. तर १०७ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सरकारी यंत्रणांना लागलेला नाही. त्यामुळे १०७ पाकिस्तानी नागरीक नेमके गेले कुठे, ते कोण आहेत, ते सध्या काय करतात, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Pahalgam Terror Attack: हिनेच सुपारी देऊन…; पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल संतापजनक पोस्ट; ओसाफ नेमका कोण?
राज्यात एकूण ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. यातील जवळपास निम्मे नागरिक उपराजधानी असलेल्या नागपुरात राहतात. त्यांची संख्या २ हजार ४५८ इतकी आहे. तर ठाण्यात १ हजार १०६ पाकिस्तानी नागरिक आहेत. पाकिस्तानातून आलेल्या १०७ नागरिकांचा ठावठिकाणा प्रशासनाला माहीत नाही. यातील २५ ते ३० जण नागपुरात वास्तव्यास होते. पण आता त्यांच्याबद्दल कोणतीही प्रशासनाकडे नाही.
ठाण्यातील ३३, रायगडमधील ११ जण पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत. जळगावात ३९३, अमरावतीत ११७, नवी मुंबईत २३९, पिंपरी-चिंचवडमध्ये २९० पाकिस्तामी नागरिक वास्तव्यास आहेत. राज्यातील २०८८ पाकिस्तानी नागरिक मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे राज्यात वास्तव्यास आहेत. १०७ पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Pahalgam Terror Attack: प्लान A, प्लान B, 35 बंदुका! कोडमध्ये बोलणारा, धर्म विचारणारा ‘तो’ संशयित खेचरवाला ताब्यात
राज्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी जवळपास ४ हजार जण लॉन्ग टर्म व्हिसावर वास्तव्यास आहेत. यामध्ये सिंधी समुदायातील व्यक्तींची संख्या मोठी आहे. फाळणीनंतर यातील बहुतांश जण पाकिस्तानातच राहिले. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी पाकिस्तान सोडला. तेव्हापासून ते भारतातच राहत आहेत. त्यांच्या व्हिसाला सरकारकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे.

