• Sun. Jun 21st, 2026

    महाडमधील पशुसंवर्धनची जागा कुणबी, बुरुड समाजास देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 24, 2025
    महाडमधील पशुसंवर्धनची जागा कुणबी, बुरुड समाजास देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद




    मुंबई दि. २४ – महाड नवेघर येथील २५ एकर जमिनीपैकी तीन गुंठे जमीन ही कुणबी समाजाला देण्यात आली आहे. तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेली सहा गुंठे जागा बुरुड समाजाला समाज मंदीर आणि विद्यार्थी वसतिगृहासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुढील १५ दिवसात प्रस्ताव देण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

    महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, बुरुड समाजाने सामाजिक कामासाठी जागा मागितली आहे. ही जागा ही जिल्हा परिषदेची असून ती पशुसंवर्धन विभागाला २००८ साली देण्यात आली आहे. ती जागा पशुसंवर्धन विभागाने विकसित केलेली नसून सध्या ही जागा बुरुड समाजाला आवश्यक असल्याने त्यांना देण्यात यावी. त्याच्या बदल्यात रायगड जिल्हाधिकारी यांनी महाड शहरात महसूल विभागाची उपलब्ध असलेली जागा पशुसंवर्धन विभागाला द्यावी, असे आदेशही मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले.

    रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले, पशुसंवर्धन आणि महसूल विभागाने या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेतला हे महत्त्वपूर्ण आहे. विकासाच्या दृष्टीने असे निर्णय योग्य ठरतात. जिल्हाधिकारी यांनी तातडीने याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा.

    जागेची अदलाबदली आणि बुरुड समाजाला अटी शर्तींवर जागा उपलब्ध करुन देण्याबाबत असे दोन प्रस्ताव सादर करण्यात यावेत, अशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

     

    00000

    बी.सी.झंवर/विसंअ







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed