• Sat. Mar 14th, 2026

    प्रशासनातील यशस्वी गोष्टींचे प्रमाणीकरण आवश्यक, सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 21, 2025
    प्रशासनातील यशस्वी गोष्टींचे प्रमाणीकरण आवश्यक, सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबईदि. २१ : प्रशासनिक सेवेत महाराष्ट्र अग्रणी राज्य असून त्याचा आदर्श देशभरात घेतला जातो, या पार्श्वभूमीवर प्रशासनातील यशस्वी  गोष्टींचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. जेणेकरुन अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून यशस्वी केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा व्यापक उपयोग होईलत्यादृष्टीने सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण केला पाहिजेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील सन २०२३-२४ तसेच सन २०२४-२५ या वर्षातील पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी  कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढामुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्राला शिवकालीन काळापासून प्रशासकीय कार्यपद्धतीचा उत्कृष्ट वारसा लाभलेला असून येत्या दहा पंधरा वर्षात राज्याला जागतिक स्तरावर अनेकविध संधी उपलब्ध होणार आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत देशाचे मजबूत स्थान निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला महत्वपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहेमहाराष्ट्राच्या सक्रिय सहभागातून देशाचे ध्येय साध्य होण्यास मोठे सहाय्य मिळते. यासर्वांत प्रशासकीय अधिका-यांचे योगदानगतिमानतापारदर्शक लोकाभिमुख कार्यपद्धतीचा स्विकार निश्चितचं महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. महाराष्ट्राला ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यापासून कुणीही रोखू शकत नाहीकिंबहुना ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे हे ध्येय महाराष्ट्र  प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीने मुदतीपूर्वीच साध्य करु शकते.  राज्य शासनाने राबवलेल्या शंभर दिवसाच्या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी सर्व विभागांनी केली आहे. या संकल्पनेच्या यशाचे श्रेय हे प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचे असून काम पारदर्शक आणि गतीमानतेने यशस्वी होते याची अनेक उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे लोकसेवेच्या भावनेतून केलेल्या कामाचे समाधान हे अधिका-यांनाही वेगळा आनंद देऊन जाते. अनेक ठिकाणी जेव्हा लोक वीस तीस वर्षांपूर्वी केलेल्या एखाद्या अधिका-याच्या कामाचा दाखला देता तेव्हा आपल्या कामातून मिळविलेली ही ओळख मोठी गोष्ट असते. चांगल्या भावनेतून केलेले काम हे यशस्वी होतेच. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात .तंत्रज्ञानाचा व्यापक स्विकार आणि वापर हा गरजेचा आहे.अनेक विभागांच्या चांगल्या कल्पनांचे,निर्णयाचे प्रमाणिकरण व्हायला पाहिजेजेणेकरुन व्यापक स्तरावर त्या कामांचा लाभ इतरांनाही होईल.

    प्रशासनात लोकाभिमुख दृष्टिकोनपारदर्शक कारभार आणि गतिशील कार्यपद्धती महत्वाची आहे.  यामुळे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून  आणता येतो. लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी अधिका-यांची असते. लोकसेवेचा भाव मनात असेल तर ही जबाबदारी यशस्वी होते. अशा चांगल्या कार्याला पुरस्कार मिळणे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळणे यादृ्ष्टीने पुरस्कार आणि त्यातुन मिळणारे प्रोत्साहन निश्चितच प्रेरणादायी आहे. ही ऊर्जा भविष्यातील कार्यासाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.सर्व पुरस्कारार्थींचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन करुन नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

      प्रास्ताविक मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. तर यशदाचे अपर महासंचालक राहुल रंजन महिवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी सनदी अधिकारी सुरेश कुमारके.पी.बक्षीस्वाधिन क्षत्रीयअजित कुमार जैन यांच्यासह इतर सनदी अधिकारीपुरस्कारार्थी उपस्थित होते.

    प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान दरवर्षी राबविण्यात येते. या अभियानातंर्गत तालुकाजिल्हाविभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना / उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्थाअधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.

    प्रशासकीय गतिमानता अंतर्गत सन २०२३ – २४ चे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :-

     मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून येणाऱ्या प्रस्तावात सामान्य प्रशासन विभागास प्रथम क्रमांकाच्या दहा लाख रुपयांच्या पारितोषिकाने अपर मुख्य सचिव यांना गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक अन्न व नागरी पुरवठा विभाग 6 लाख रु. पारितोषिकतृतीय क्रमांक मराठी भाषा विभाग ४ लाख रु. देऊन गौरविण्यात आले.

     राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणाऱ्या प्रस्तावात प्रथम क्रमांकाच्या दहा लाख रुपयांच्या पारितोषिकाने विभागीय आयुक्तनागपूरद्वितीय क्रमांक – व्यवस्थापकीय संचालकमहिला आर्थिक विकास महामंडळ 6 लाख रु. पारितोषिकतृतीय क्रमांक – विभागीय आयुक्तअमरावती ४ लाख रु. देऊन गौरविण्यात आले.

    विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावात प्रथम क्रमांक – अति. जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर 10 लाख रु.द्वितीय क्रमांक – जिल्हाधिकारीवर्धा 6 लाख रु. पारितोषिकतृतीय क्रमांक – मुख्य अधिकारीनगर परिषद निलंगाजि. लातूर ४ लाख रु. देऊन गौरविण्यात आले.

    महानगरपालिका गटात प्रथम क्रमांक – आयुक्तनागपूर महानगपालिका 10 लाख रु.द्वितीय क्रमांक आयुक्तपुणे महानगरपालिका 6 लाख रु. पारितोषिकतृतीय क्रमांक – आयुक्तचंद्रपूर महानगरपालिका ४ लाख देऊन गौरविण्यात आले.

    सर्वोत्कृष्ट कल्पना/ उपक्रम प्रथम क्रमांक  मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषदवाशिम 50 हजार रुपयेद्वितीय क्रमांक – ग्रामपंचायत बोराडीजिल्हा परिषदधुळे 30 हजार रुपयेतृतीय क्रमांक – मुख्य अधिकारीएरंडोल नगरपालिकाजिल्हा जळगाव

    सर्वोत्कृष्ट अधिकारी गटात प्रथम क्रमांक – योगेश कुंभेजकर, (तत्कालीन) जिल्हाधिकारीभंडारा 50 हजार रुपयेद्वितीय क्रमांक – निलेश देशमुख, (तत्कालीन) उप आयुक्तपिंपरी चिंचवड महानगरपालिका 30 हजार रुपयेतृतीय क्रमांक – रामदास कोकरे, (तत्कालीन) जिल्हा सह आयुक्तनगर परिषद प्रशासनलातूर 20 हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

    शासकीय कर्मचारी गटात प्रथम क्रमांक – सहायक शिक्षकविद्यामंदिरयादववाडीता. करवीरजिल्हा कोल्हापूर 50 हजार रुपयेद्वितीय क्रमांक – पुरुषोत्तम रमेशचंद्र ठाकूरतलाठीकळंबेतालुका करवीरजिल्हा कोल्हापूर 30 हजार रुपयेतृतीय क्रमांक – जनार्दन दत्तात्रय बंगाळेमंडल अधिकारीखिरोदातहसील कार्यालययावलजिल्हा जळगाव 20 हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

    सन 2024 – 25 चे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे

       मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून येणारे प्रस्तावामध्ये प्रथम क्रमांकप्रधान सचिवलेखा व कोषागारेवित्त विभाग मंत्रालयमुंबई १० लाख रुपये देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांकवस्त्रोद्योग विभाग मंत्रालयमुंबई यांना ६ लाख रुपये देऊन गौरवण्यात आले.

       विभागीय स्तरावरील प्रस्तावामध्ये प्रथम क्रमांकसहसंचालकव्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रीय कार्यालय अमरावती यांना १० लाखरुपये देवून गौरव करण्यात आले. द्वितीय क्रमांकपोलीस अधिक्षकवाशिम यांना ६ लाख रुपये देऊन गौरवण्यात आले. तृतीय क्रमांकजिल्हाधिकारी कार्यालयगडचिरोली यांना ४ लाख रुपये देऊन गौरवण्यात आले.

    महानगरपालिका स्तरावरून येणारे प्रस्ताव या विभागात प्रथम क्रमांक – आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना (१० लाख रुपये )द्वितीय क्रमांक – आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना (६ लाख रुपये ) तृतीय क्रमांक – आयुक्त चंद्रपूर महानगरपालिका यांना ( ४ लाख रुपये) देऊन गौरवण्यात आले.

    सर्वोत्कृष्ट कल्पना उपक्रम अंतर्गत  शासकीय संस्था विभागात प्रथम क्रमांक,जिल्हाधिकारी कार्यालयवाशिम द्वितीय क्रमांकजिल्हाधिकारी कार्यालय अमरावती तृतीय क्रमांकमुख्य कार्यकारी अधिकारीलातूर यांना मिळाला.

    शासकीय अधिकारी या विभागात प्रथम क्रमांक विकास रमेश नवले मुख्य अधिकारीदेवळाली प्रवरा नगर परिषदजिल्हा अहिल्या नगरद्वितीय क्रमांक निखिल राजू पाटील नायब तहसिलदारतहसील कार्यालयकुरखेडाजिल्हा गडचिरोली तृतीय क्रमांक जिल्हाधिकारी नागपूर विपिन इटनकरआणि मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषदनागपूर विनायक महामुनी यांना मिळाला.

    शासकीय कर्मचारी विभागात प्रथम क्रमांक मोहसीन शेख मंडळ अधिकारीराहताजिल्हा अहिल्यानगरद्वितीय क्रमांक ज्योती नागलवडे शिक्षिकाजिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळातुमसरजिल्हा भंडारा तृतीय क्रमांक कामराज चौधरी ग्रामीण महसूल अधिकारीपुसद यांना मिळाला.

    ****

    वंदना थोरात/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed