Ashish Shelar and Raj Thackeray Friend : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रूत आहे. पण आता याच मैत्रीत कटूता आल्याचे चित्र आहे. याचे कारण ठरले ते राजकीय हेवेदावे.
राज ठाकरे यांनी अनेकदा आपल्या भाषणातून सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केले आहे. अलीकडेच राज ठाकरेंनी आमदारांचा खोकेबहाद्दर म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर आशिष शेलार यांनीही ठाकरेंच्या वक्तव्याचा तिखट शब्दांत समाचार घेतला. ‘आपल्या पक्षाचा एकही आमदार, खासदार नसणाऱ्यांनी यावर बोलू नये’ असे आशिष शेलार म्हणाले होते. यातूनच शेलार-ठाकरेंमध्ये वादाची ठिणगी पडली होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या नेत्यांकडूनही शेलारांना टार्गेट करण्यात आले. यातच संदीप देशपांडे यांनीही शेलारांवर ‘आशिष झोलार’ म्हणून टीका केली. सोबतच, मनसेच्या व्यासपीठावरुनही शेलारांना लक्ष्य करुन व्यंगात्मक कविता करण्यात आली. यानंतर आशिष शेलारांनी केलेल्या या विधानामुळे दोन राजकीय मित्रांमध्ये कटुता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

