• Fri. Mar 20th, 2026
    छेडखानी, लग्न जुळताच ब्लॅकमेलिंग, तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीचं भयंकर पाऊल, बीडमध्ये खळबळ

    Beed Young Woman Ends Life: बीडमध्ये एका तरुणीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

    Lipi

    दीपक जाधव, बीड: छेडखानी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमधील के.एस.के. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेक कदम असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. पीडित मुलीचं लग्न ठरलं होतं. अभिषेक कदम हा तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेतला. या घटनेला एक महिना पूर्ण झाला तरी देखील न्याय मिळत नाही, त्यामुळे तिच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.

    सध्या हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. धाराशिव पोलिसांनी कसलंही सहकार्य केले नाही, असा आरोप साक्षीची आई कोयना विटेकर यांनी केला आहे. माझ्या मुलीसोबत जे घडलं ते इतर मुलींसोबत घडू नये, त्यासाठी यातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील पीडित कुटुंबाने केली आहे. दरम्यान, धाराशिव पोलिसांनी आरोपी अभिषेक कदम याला अटक केली असून त्याची जामीनावर देखील सुटका झाली आहे.
    Telangana Shocking News: बॉयफ्रेण्डसाठी पोटच्या तीन लेकरांना दह्यातून विष दिलं, नवरा उपाशीच घरातून निघाला अन्…
    अभिषेक कदम या आरोपीने या आधी देखील अनेक मुलींची छेडखानी केली आहे. त्याच्यावर यापूर्वी दोन मुलींची छेड काढण्याचा गुन्हा आहे. के.एस.के. महाविद्यालयात हा प्रकार घडला. पीडित तरुणीने आपल्या आयुष्याची अखेर केल्यानंतर के.एस.के. महाविद्यालयात प्रशासन अद्याप गाफील आहे. महाविद्यालय प्रशासनाकडून साधी विचारपूसही करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. याच महाविद्यालयात महिनाभरात तीन मुलींनी आपलं आयुष्य संपवल्याचं समोर येत आहे.

    या प्रकरणात आरोपी अभिषेक कदम याच्यासह त्याची बहीण शितल कदम या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी शितल कदम ही रेल्वे पोलीस दलात कार्यरत आहे. त्यामुळेच धाराशिव पोलिसांकडून कारवाई दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांकडून यांनी केला आहे. या प्रकरणात अनेक आमदारांनी देखील तपास अमलदार यांना फोन केल्याच्या समजते.

    Beed News: छेडखानी, लग्न जुळताच ब्लॅकमेलिंग, तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीचं भयंकर पाऊल, बीडमध्ये खळबळ

    धाराशिवचे पोलीस उपाधीक्षक स्वप्निल राठोड यांच्याकडे हा तपास होता. स्वप्निल राठोड यांनी पीडित कुटुंबाला तासंतास कार्यालयाच्या बाहेर वेठीस ठेवले. आमची कुठलीही साक्ष पोलीस उपाधीक्षक स्वप्निल राठोड यांनी घेतली नाही. उलट तुमच्या मुलीने असं का केलं, असे आम्हाला विचारण्यात आलं, असाही आरोप कुटुंबाने केल आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed