Nanded Two Cousins Died: मांडव बांधत असताना विद्यु तारेचा शॉक लागल्याने दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली.
मृत दोन्ही तरुण हे बोरगाव येथील हस्तारा येथील रहिवासी होते. भट्टेवाड कुटुंबियांचा टेन्ट हाऊस आणि मंडप डेकोरेशनाचा व्यवसाय आहे. रविवारी (२० एप्रिल) गावात विवाह सोहळा होता. लग्नाची ऑर्डर असल्याने पांडुरंग भट्टेवाड साईनाथ भट्टेवाड, शिवप्रसाद भट्टेवाड हे तिघे जण शनिवारी रात्री लग्नाचा मांडव उभारत होते. मांडव उभारण्याचं काम सुरु असताना अचानक वारा सुटला आणि अर्धवट अवस्थेत असलेला मांडव हवेत उचलला गेला. त्यामुळे मांडवाला विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि शॉक लागून तीघे जण जमिनीवर कोसळले. गावकऱ्यांनी तिघांना तातडीने हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
Telangana Shocking News: बॉयफ्रेण्डसाठी पोटच्या तीन लेकरांना दह्यातून विष दिलं, नवरा उपाशीच घरातून निघाला अन्…
रुग्णालयातील डॉ. दादासाहेब ढगे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने पांडुरंग भट्टेवाड आणि साईनाथ भट्टेवाड या दोन सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू झाला. तर, शिवप्रसाद भट्टेवाड हा जखमी झाला आहे. त्याच्यावर हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत शव विच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह महावितरण कार्यालयात आणून नागरिकांनी धरणे आंदोलन केले.
Nanded News: लग्नाचा मांडव बांधताना नको ते घडलं अन् दोन भावांचा एकत्र अंत, पाहून सारं गाव हळहळलं
महावितरण विभागाच्या हलगर्जीपणा मुळे दोघांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर छोटेखानी विवाह सोहळा पार पडण्यात आला. दोन मुलांच्या मृत्यूने भट्टेवाड कुटुंबियावर दुःखाच डोंगर कोसळलं आहे.

