• Wed. Mar 11th, 2026

    Raj and Uddhav Thackeray : “शिंदेंचं आणि चिडणाऱ्या मनसे नेत्यांचं ‘मनी’मिलन झाल्यासारखं वाटतं”, अखिल चित्रे यांचं ट्विट चर्चेत

    Raj and Uddhav Thackeray : “शिंदेंचं आणि चिडणाऱ्या मनसे नेत्यांचं ‘मनी’मिलन झाल्यासारखं वाटतं”, अखिल चित्रे यांचं ट्विट चर्चेत

    Akhil Chitre on Raj and Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या वृत्तावर विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे यांनी तर दोन्ही ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी राज ठाकरेंवर अतिशय खोचक टीका केली आहे. तर एकनाथ शिंदे हे देखील पत्रकारावर संतापले. यामुळे अखिल चित्रे यांनी मनसे आणि शिंदे गटाच्या नेत्यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रासाठी आपण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यास तयार असल्याचं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. पण राज ठाकरे यांना सोबत यायचं असेल तर त्यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकीय मैत्री ठेवू नये, अशी अट उद्धव ठाकरे यांनी ठेवली आहे. त्यांच्या या अटीवरुन मनसे नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासाठी जास्त आग्रही असल्याचं बघायला मिळत आहे.

    ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या वृत्तावर विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे यांनी तर दोन्ही ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी राज ठाकरेंवर अतिशय खोचक टीका केली आहे. खुद्द शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे हे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या वृत्तावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संतापलेले बघायला मिळाले. तर दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांनी ठेवलेली अट पाहून त्यांच्यावर टीका केली. तसेच मनसे नेते अमेय खोपकर यांनी अशी अभद्र युती होऊ नये, असं म्हटलं आहे.

    भाजप, शिंदे गट यांच्याकडून राज ठाकरेंवर होत असलेली टीका आणि मनसे नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर केली जाणार टीका हे पाहून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अखिल चित्रे यांनी बरेच वर्ष मनसेसोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आहे. कितीही काही झालं तरी युतीचा निर्णय हा अंतिमत: दोन्ही पक्षप्रमुखच घेतील, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे.

    अखिल चित्रे काय म्हणाले?

    “नितेश राणे, ज्योती वाघमारे सारखी माणसं राज ठाकरे साहेबांवर गरळ ओकत आहेत त्यावर मूग गिळून गप्प बसलेले मनसेचे दादा, भाई, सारखी फिल्मी लोकं आज ठाकरे एकत्र येणार ह्या चर्चेवर एकनाथ शिंदेसारखे चिडले का? शिंदेंच आणि चिडणाऱ्या मनसे नेत्यांचं मनीमिलन माफ करा मनोमिलन झाल्यासारखं वाटलं. असो. युतीचा निर्णय अर्थात दोन्ही पक्षप्रमुखच घेतील”, असं ट्विट अखिल चित्रे यांनी केलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed