• Fri. Mar 6th, 2026
    आश्रमशाळेच्या अधीक्षकाचे घृणास्पद कृत्य, शाळेतीलच विद्यार्थिनीवर अत्याचार; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

    Nanded News : ‘तू मला खूप आवडतेस, आय लव यू, माझ्या सोबत चल,’ असं म्हणत आश्रम शाळेतील एका ४० वर्षीय अधीक्षकाने शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अधीक्षकाविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : ‘तू मला खूप आवडतेस, आय लव यू, माझ्या सोबत चल,’ असं म्हणत आश्रम शाळेतील एका ४० वर्षीय अधीक्षकाने शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात अधीक्षक गजानन राजरवाड विरोधात पोक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील दौलापूर रस्त्यावर संत गोरोबा प्राथमिक आश्रमशाळा आहे. याच शाळेत गजानन राजूरवाड हे अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर पीडित मुलगी ही आश्रम शाळेत सातवी वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपीने ९ एप्रिल आणि ११ एप्रिलला शाळेच्या परिसरात आणि आश्रम शाळेतील रूममध्ये जाऊन मुलीचा विनयभंग केला. ‘तू मला खूप आवडतेस, आय लव यू, माझ्या सोबत चल’ असं तो पीडित मुलीला म्हणायचा.

    त्याच्या घृणास्पद कृत्याबद्दल पीडित मुलीने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी १८ एप्रिलला कुंडलवाडी पोलीस ठाण्याच गाठले आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गजानन राजरवाड विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते करीत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed