राज्यात हवामानातील बदलांमुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गारपिटीमुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असून, हवामान खात्याने लातूर, नांदेड, धाराशिव, नागपूर, भंडारा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४२.०२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात अवकाळीचा फटका बसला आहे.
चंद्रपूर, जळगाव, सांगली, नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा फटका
चंद्रपूर, जळगाव, सांगली, नाशिक याठिकाणी अवकाळी पाऊस झालाय. आजही भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट काही भागांमध्ये देण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याकडून आज लातूर, नांदेड, धाराशिव, नागपूर, भंडारा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडाया, यवतमाळ या भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाचा येलो दिला आहे.
Pune News : आजी-आजोबांचा लाडका ‘चिकू’ गेला! पुण्यातील माजी आमदाराच्या २० वर्षीय नातवाचं अकस्मात निधनआज पावसाचा हवामान खात्याकडून येलो अलर्ट
राज्यातील इतर काही ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून देण्यात आलीये. मुंबईमध्ये आज वातावरण सामान्य राहिले. पुण्यात देखील सातत्याने पारा चढताना दिसतोय. हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाला पोषक असे वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा हजेरी लागताना दिसत आहे.
अकोला, चंद्रपूर, धुळ्यात पारा वाढला
दुसरीकडे चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आलीये. काल अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यात ४२.०४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये तर चंद्रपूरमध्ये ४२.०२ अंश सेल्सिअस, धुळे ४२.०२ अंश सेल्सिअस याप्रमाणे तापमानाची नोंद करण्यात आलीये. कोकणात देखील तापमानात वाढ होताना दिसतंय. हवामानातील उकाडा देखील वाढलाय. मराठवाड्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचे बघायला मिळत आहे.

