Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम14 Apr 2025, 7:57 pm
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर हे मावळातील तळेगाव येथे जवळपास दहा वर्ष अधून-मधून वास्तव्यास होते. येथील अल्टिनो कॉलनीतील बाबासाहेबांचं निवासस्थान आता ‘संविधान भूमी’ म्हणून ओळखलं जातं. १९४८ ते १९५६ या दरम्यान तळेगाव दाभाडे इथल्या या बंगल्यात बाबासाहेब वास्तव्याला असायचे. याच घरात आज नव्या पिढीवर शिक्षणाचे संस्कार घडताना दिसतात. या बंगल्यात विद्यार्थ्यांची अभ्यासिका सुरू असून आत्तापर्यंत येथे अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत नोकरी प्राप्त झाली असल्याचं सांगण्यात येतं. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी सुद्धा याच घरात राहून अनेक डिग्री प्राप्त केल्या होत्या.