Nagpur Crime News : नागपुरात पान टपरीवर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि हत्येची घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मृत व्यक्ती तसंच हल्लेखोराविरोधातही पोलिसात गुन्हे दाखल
जितेंद्र ऊर्फ जितू राजू जयदेव वय ४० रा. भीम चौक, असं मृतकाचं नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी इतवारीदास शिवदास माणिकपुरी वय ३५ रा. नवीननगर याला अटक केली आहे. जितूविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. इतवारीदासविरोधात घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.Nagpur News : मित्रानेच केला मित्राचा घात; कोल्डड्रिंकमधून विष देत संपवलं, कारण हैराण करणारं, नागपुरातील थरारक घटना
मोबाइलवरुन वाद विकोपाला गेला
इतवारीदासचा मोबाइल चोरी गेला. जितू याने मोबाइल चोरी केल्याचा संशय त्याला आला. सोमवारी सायंकाळी इतवारीदास हा हिवरीनगरमधील पान ठेल्यावर गेला. येथे जितू उभा होता. इतवारीदास याने जितूकडे मोबाइलबाबत विचारणा केली. माझ्याकडे मोबाइल नाही, असं जितू त्याला म्हणाला. यावरुनच दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला.
Nagpur News : पान टपरीवर वाद विकोपाला गेला आणि नको ते घडलं; नागपुरातील घटनेने खळबळ
वादादरम्यान आरोपीकडून काठीने डोक्यात वार
वादादरम्यान जितूने इतवारीदासच्या कानशिलात लगावली. इतवारीदास संतापला. त्याने काठीने जितूच्या डोक्यावर वार केले. तिथेच घटनास्थळीच जितूचा मृत्यू झाला. जितूवर हल्ला करुन, त्याला ठार केल्यानंतर इतवारीदास घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी जितूचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा शोध घेऊन इतवारीदास याला पोलिसांनी अटक केली आहे.