बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर…व परिसराच्या विकासासाठी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मंजूर असलेल्या…286 कोटी रुपयांतून सुरू असलेल्या विविध कामांची माजी मंत्री तथा परळीचे…आमदार धनंजय मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांच्या तसेच कंत्राटदारांच्या समवेत पाहणी केली. मंदिर परिसरात भव्यदर्शन मंडपाचे काम सुरू असून आता चौथ्या मजल्याचेही काम पूर्ण झाले आहे.