• Tue. Mar 17th, 2026

    बंद कारखान्यात व्यापाऱ्याची बॉडी, पोलिसांना एक संशय अन् भयंकर घटनेचा उलगडा, अकोल्यात खळबळ

    बंद कारखान्यात व्यापाऱ्याची बॉडी, पोलिसांना एक संशय अन् भयंकर घटनेचा उलगडा, अकोल्यात खळबळ

    Akola Businessman Death Case: अकोल्यात एका व्यापाऱ्याचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

    Lipi

    प्रियंका जाधव, अकोला: अकोला जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरोडे, खून, चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दहिखेड फुटकर शेतशिवारात बंद अवस्थेतील एका हाडांच्या कारखान्याच्या अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीत एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. रमन चांडक असं खून झालेल्या व्यापाऱ्यांचं नाव आहे. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून गुन्हा दाखल केला आहे.

    मृतदेह आढळल्यानंतर आत्महत्या की खून या चर्चा परिसरात रंगलेल्या असतानाच अकोल्याच्या अकोट ग्रामीण पोलिसांनी मृतदेहावरील खानाखुणा आणि रक्तस्रावावरून हा खूनच असल्याचा संशय व्यक्त करत त्या दिशेने तपास सुरू केला. मृतकाच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली. मृत हे रमन चांडक असल्याचं निष्पन्न झालं. चांडक हे अकोट तालुक्यातील पणज येथील मुळ रहिवाशी होते व सद्यस्थितीत आकोला येथे ते वास्तव्यास होते.

    रमन चांडक हे गाड्या विक्री आणि देवाणघेवाणीचे व्यवहार करायचे आणि हा खून आर्थिक देवाणघेवाणीतून झाला असल्याचा संशय पोलिसांना आला. या संशयाच्या आधारावर पोलिसांनी गजानन रेडे नामक व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये हा खून आर्थिक देवाणघेवाणीतूनच झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आरोपी गजानन रेडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणी साठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
    Prasanna Sankar: कितीही वेदनेत असले तरी मला करावंच लागायचं; वेश्या, ओपन मॅरेज अन्… प्रसन्ना शंकरच्या पत्नीने काय-काय सांगितलं?

    कशी घडली घटना?

    आरोपी रेडेने आधी कापडाच्या साहाय्याने मृतकाचा गळा आवळला आणि नंतर मृतकाचे डोके दगडावर आपटून खून करण्यात आल्याच प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, नेमकं कारण हे शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल.

    अकोटमधील खुनाचा गुन्हा उलगडण्यास जास्त वेळ लागला नाही आणि पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत आरोपीला जेरबंद केलं. मात्र काही दिवसात अकोला जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, खुनाच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला की नाही असा प्रश्न जनसामान्यात उपस्थीत होतो आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed