कोल्हापूर जिल्ह्यातील सरवडे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं म्हटलंय.खासदार धैर्यशील माने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव केला. धैर्यशील माने यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळतंय.