• Wed. Apr 16th, 2025 2:11:42 AM

    Sanjay Raut : राज ठाकरेंनी आंदोलन थांबवलं; राऊत हसत-हसत म्हणाले, ‘कॅफेमध्ये काय चालतं हे…

    Sanjay Raut : राज ठाकरेंनी आंदोलन थांबवलं; राऊत हसत-हसत म्हणाले, ‘कॅफेमध्ये काय चालतं हे…

    Sanjay Raut On Raj Thackeray Marathi News : मनसे नेते राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठीचा वापर तपासण्याचे आदेश दिले होते, परंतु काही दिवसांपूर्वी हे आंदोलन थांबवायला सांगितले. मंत्री उदय सामंत यांनी ‘शिवतीर्थ’ येथे भेट घेत आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. संजय राऊत यांनी या संदर्भात राज ठाकरेंवर निशाणा साधला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    संजय राऊत यांची राज ठाकरेंवर टीका

    मुंबई : MNS Chief Raj Thackeray यांनी आपल्या यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना राज्यातील बँकांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही हे पाहण्याचे आदेश दिले होते. राज यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी बँकांमध्ये जात आपल्या मनसे स्टाइलने आंदोलनांना सुरूवात केली होती. बँकांमधील मनसेची आंदोलने चर्चेत येताना दिसत होती. मात्र आता दोन ते चार दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी आंदोलन तूर्तास थांबवायला सांगितले होते. यावरून ठाकरे गटाचे नेते Sanjay Raut यांनी एका वाक्यात राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

    राज ठाकरे यांचा काय होता आदेश?

    मराठी जनतेने आग्रह धरायला हवा. मराठी समाजाने कच खाल्ल तर मग ही आंदोलने कशासाठी करायची? सरकारकडून Reserve Bank ने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी अपेक्षा ठेवली. जिथं गृहित पकलं जात असेल किंवा मराठीचा अपमान होत असेल तिथे माझे महाराष्ट्र सैनिक चर्चा करण्यासाठी येतील, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बँकेत घुसत गोंधळ घातला होता. या आंदोलनादरम्यान महायुती सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जात भेट घेतली. त्यावेळी ठाकरेंना सामंत यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मराठीच्या वापराबाबत चर्चा करून असं आश्वासन दिलं. त्यानंतर ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्रक काढत आंदोलन तूर्तास थांबवण्यासाठी सांगितलं होतं.

    राज ठाकरे यांच्या या आंदोलनासंदर्भात संजय राऊत यांना विचारण्यात आलं. यावर संजय राऊतांनी एका वाक्यात उत्तर देत आणि हसत पत्रकार परिषदेमधून निघून गेले. मनसेने मराठी भाषा वापरण्यासंदर्भात सुरू केलेलं आंदोलन थांबवलं आहे. मराठी मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. यावर बोलताना, तुम्हाला माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे की, कॅफेमध्ये काय चालतं म्हणत राऊत निघून गेले. यावर राऊत यांना मनसेकडून काही उत्तर मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed