भाजप नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वक्फ सुधारणा २०२५ विधेयकावर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. सोबतच शिवसेना ठाकरे गटासह संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले, शिवसेना संपुष्टात आली, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपुष्टात आले. आता शिवसेनेचे नाही तर काँग्रेसचे विचार आहेत, असंही ठाकरे गटाला म्हणाले.