हे शब्द आहेत एका लेकराचे… ज्याच्या आई-वडिलांचं अख्खं आयुष्य साखर कारखान्याच्या धुरात करपलं, ऊस तोडताना ज्यांच्या हातांना फोड पडले. पण लेकराच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू द्यायचे नाहीत, असा चंग बांधलेल्या त्या आई-बापाच्या कष्टाचं चीज आज त्यांच्या लेकराने केलं! बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पिठ्ठी गावचा लेक राजेश सुरेखा ईश्वर निर्मळ…! कोणत्याही क्लासेस शिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून महाराष्ट्र राज्य पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI म्हणून निवड झालीये. ज्यामुळे गावासह पंचक्रोशीत आनंद गगनात मावेनासा झाला!