Jammu Kashmir Terror Attack : सहल आटोपून 22 एप्रिलला परत येण्याचेही नियोजन होते. मात्र काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी आम्ही सहलीचा मनसोक्त आनंद घेतला आणि हे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद केले त्याच ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला
काटोलचे तिघे आणि कोराडी येथील चौघे असे सात जण आम्ही काश्मीर सहलीला निघालो होतो. सहल छानच सुरू होती. धम्माल मस्ती केली. खरच काश्मीर नंदनवन आहे, याची प्रचिती तिथे आम्हाला आली. सहल आटोपून 22 एप्रिलला परत येण्याचेही नियोजन होते. मात्र काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी आम्ही सहलीचा मनसोक्त आनंद घेतला आणि हे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद केले त्याच ठिकाणी दहशतवादी हल्ला होतो, ही माहिती कानावर पडताच मोठा धक्का बसला.
Santosh Jagdale Wife : माझं आयुष्य पूर्ण खराब, पोरकी झाले, माझ्या माणसाचा चेहराही पाहू शकत नाही; पवारांसमोरच संतोष जगदाळेंच्या पत्नीला भावना अनावर
दैव बलवत्तर होते म्हणून आम्ही वाचलो, ही भावना मनात आली. मात्र आपल्यासारख्याच इतर पर्यटक मित्रांना जीव गमवावा लागला याचे मोठे दु:ख आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला नागपुरात येण्यासाठी साधन नव्हते. आमचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढवावा लागला. सहा ते सात हजारांची तिकीट आम्हाला २० हजार रुपयांत काढावी लागली, असे या पर्यटकांनी सांगितले.
Pahalgam Attack : फोटो काढले, पहलगामहून निघालो अन्… वाघमारे कुटुंबाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
Kaustubh Ganbote : दहशतवाद्याने विचारलं अजान पढते हो? आम्ही बायकांनी टिकल्या काढल्या, अल्लाह हू अकबर ओरडलो; गणबोटेंच्या पत्नीने सांगितला काटा आणणारा अनुभव
अर्धवट सहल सोडून
पारशिवनी तालुक्यातील आम्ही 26 जण काश्मीरला गेलो होतो. आयुष्यातील बकेट लिस्ट म्हणून आमचा काश्मीरचा प्रवास होता. सहा दिवसांचे नियोजन होते, मात्र दहशतवादी हल्ल्यामुळे चार दिवसांतच आम्हाला आमची सहल आटोपावी लागली. सैन्याच्या सुरक्षेत आम्ही बाहेर पडलो. हल्ला झाला तेव्हा आम्ही गुलमर्गला होतो. अंतर दूर असले तरी त्याची दाहकता आम्हाला सोसावी लागली. असे पंकज भोवते यांनी सांगितले. समता नगर येथील मोहन जुमळे यांचा 26 जणांचा मित्र परिवारही काश्मीरला गेला होता. विदर्भाच्या वेगवेगळ्या भागातून सहलीसाठी एकत्र आलेल्या मित्रांनाही चार दिवसांत आपली सहल थांबवावी लागली. हल्ला झाला तेथून आम्ही 25 किलोमीटर अंतरावर होतो, असे मोहन जुमळे यांनी सांगितले.

