Authored byमानसी देवकर | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम3 Apr 2025, 3:59 pm
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी परभणीतील सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अशीच शिक्षा द्यावी अशी मागणी नवनाथ वाघमारेंनी केली. यावेळी वाघमारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.