वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले. विरोधकांनी याला प्रखर विरोध केला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याचा विरोध करत मुसलमानांच्या संपत्तीचा गैरवापर होणार असल्याचा आरोप केला. विधेयकामुळे मोकळ्या जमिनींच्या विक्रीतून निधी उभारून गरीब मुस्लिम महिलांना मदत केली जाईल असा दावा केला आहे.
मुसलमानांचा उद्धार होणार असल्याची भाषा केली हे निव्वळ ढोंग आहे. अडीच लाख कोटींच्यावर ज्या प्रॉपर्टीचं किंमत मूल्य केलेलं आहे, अशा प्रॉपर्टीवर आपला अधिकार रहावा यासाठी काल सगळा खेळ झाला. काल अमित शहांच्या भाषणातून एक सत्य बाहेर पडलं, त्यांच्या भाषणात २०२५ पर्यंतच्या मशिदी, मदरसे आणि दर्गे याला हात लावणार नाही. पण रिक्त जमिनींची विक्री करू त्या पैशातून गरीब मुस्लिम महिलांना दान करू. म्हणजे शेवटी खरेदी-विक्रीवरती आले आहेत. जमिनींचं रक्षण करण्यासाठा कायदा आणला असेल, पण काल नकळत त्यांच्या तोंडातून मोकळ्या जमिनींचा सौदा करू हे सत्य बाहेर पडलं. मोकळ्या जमिनींची किंमत दोन लाख कोटी आहे, त्यांच्या पोटात जे ढवळत होतं हे बाहेर आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.चर्चा वक्फ विधेयकावर, उल्लेख मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाचा, भाजप नेता नेमकं काय म्हणाला?
आता या मोकळ्या जमिनी कोण-कोणाला आणि कशा पद्धतीने विकणार? जशी धारावी विकण्यात आली, मुंबईसह देशभरातील विमानतळे विकण्यात आली. या देशामध्ये विकणारे दोन आणि विकत घेणारेही दोन आहेत. दुसरं कोणाला या जमिनी जाणार आहेत का? म्हणजे हा सगळा खटाटोप मुसलमानांच्या भल्यांच्या नावाखाली काय आहे हे देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून बाहेर पडलं. तम्ही त्यांचं भाषण ऐका, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
महाराष्ट्र आणि मुंबईमधील वक्फ बोर्डाच्या जमिनींचे व्यवहार आधीच झाले आहेत. या व्यवहाराच्या खरेदी-विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं हे स्पष्ट आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भाती आम्ही समजू शकतो. त्यांनी उगाच राष्ट्रीय ऐक्य, मुसलमान ऐक्य आणि हिंदु मुसलमान, अमित शहांचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगुलचालन हे बॅरिस्टर जिना यांनीही केलं नव्हतं. अमित शहांनी केलेले भाषण म्हणजे लांगुलचालनाचा अत्युच्च नमुना होता. याचं कारण दोन लाख कोटींच्या जमिनी असल्याचं म्हणत संजय राऊतांनी शहांवर निशाणा साधला.