उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिवसभर बीडच्या दौऱ्यावर असणार आहेत.. त्यांच्या या दौरादरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. शहराच्या विविध भागात अजित पवार हे बैठकांना उपस्थित राहणार असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे याबरोबरच पक्ष पदाधिकाऱ्यांकडून देखील जोरदार तयारी करण्यात आली असून शहराच्या विविध भागात मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत विशेष म्हणजे निवडणुकीनंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुलाबी रंगाची थीम कायमच ठेवली असल्याचे या बॅनर्स मधून दिसत आहे. दरम्यान अजित पवारांच्या या दौऱ्यात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नाहीत प्रकृतीच्या कारणामुळे आपण अनुपस्थित राहणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे.