कळंबमध्ये आढळलेल्या मृत महिलेबाबत अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केला आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात ज्या महिलेच्या घरी….त्यांना नेण्यात येणार होतं त्याच महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा मृतदेह घरात पडून असल्याने वास सुटला होता. त्यानंतर घराचे दार तोडून मृतदेह बाहेर काढला गेला. मात्रा आता संबंधित महिलेचा मृत्यू कसा झाला? तिची हत्या झाली का? हत्येमागे कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर अंजली दमानिया यांनी ट्विट करत महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केलाय.महिला एकावेळी पाच नावांचा वापर करत असल्याचं दमानियांनी म्हटलं आहे.
मनिषा नावाच्या महिलेच्या नावांची यादी वाचली, गृहमंत्र्यांसह धनंजय मुंडेंवर निशाणा, दमानिया आक्रमक!
