महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Mar 2025, 7:34 pm
Devendra Fadnavis: शासकीय कामासाठी जिल्ह्यातील अनेक वाळू घाट आरक्षित ठेवण्यात आले आहेत. या वाळू घाटातून होणारा वाळूचा उपसा आणि शासकीय कामासाठी लागणाऱ्या वाळूचा ताळमेळ जुळता जुळेना अशी स्थिती आहे.
वाळूचा नियमबाह्य उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून कार्यवाही करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. मात्र कार्यवाही होण्यापूर्वीच महसूल विभागाचे हात थरथरु लागले आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या विषयावर बोलायला तयार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे ओठ कुणी शिवले अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.Gauri Khedekar Murder: ‘तेव्हा’ गौरी जिवंत होती; राकेश तिला मुद्दामहून बंगळुरुला घेऊन आला; तपासातून धक्कादायक उलगडा
विधानसभेचा निवडणुकीत भाजपाला जिल्ह्यात मोठे यश मिळाले. भाजपचे पाच आमदार निवडून आलेत. पाच आमदार असलेल्या या जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नावर कुणी बोलायला तयार नाही. जिल्ह्यात पर्यावरणाच्या नावाखाली वाळू घाटांचे लिलाव रखडलेले आहेत. यामुळे घरकुल योजना प्रभावित झाली आहे. वाळू मिळत नसल्याने हजारो घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. घरकुल लाभार्थ्यांनी जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली अडचण सांगितली. श्रीमती फडणवीस यांनी लोकांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन मुल तालुक्यातील हळदी, उतळपेठ, उश्राळा, चिंमढा या चार गावातील गावकऱ्यांना घेऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शोभाताई फडणवीस यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यात सुरु असलेल्या वाळू तस्करीचा मुद्दा चर्चेत आला आहे.Gauri Khedekar Murder: गौरीच्या बॉडीची विल्हेवाट लावण्याचा प्लान होता, पोलिसांना संशय; राकेशची योजना कशामुळे फसली?
महसूल विभागाला झालंय काय?
वाळू घाटाचे ठेकेदार आणि महसूल विभागाच्या ‘अर्थ’पूर्ण संबंधाची चर्चा होत असते. वाळूचा नियमबाह्य उपसा बिनदिक्कतपणे सुरु आहे. त्यामुळे या सगळ्याला महसूल विभागाची मूक संमती असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. रात्रभर वाळूचा उपसा केला जातो. या गोरखधंद्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याचेही बोलले जाते. त्यामुळेच नदी, नाल्यांचे पोट उपसणाऱ्यांकडे अधिकाऱ्यांचे कायमचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.
वाळू नव्हे सोनं…
सध्या वाळूला सोन्याचा भाव आलेला आहे. वाळू अभावी खाजगी घरांचे बांधकाम रखडले आहेत. वाळूसाठी हवी ती रक्कम मोजायला ग्राहक तयार असल्याने वाळू तस्करांची मोठी फौज जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.