• Fri. Jul 3rd, 2026

    अण्णा बनसोडे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची घोषणा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 26, 2025
    अण्णा बनसोडे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची घोषणा – महासंवाद




    मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली असल्याची  घोषणा सभागृहात केली. त्यानंतर सभागृहाच्या वतीने बनसोडे यांचे अभिनंदन करण्यात आले.

    0000

    शैलजा पाटील/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *