• Wed. Mar 11th, 2026
    पुणे महापालिकेत २६ हजार कोटींचा डक्ट घोटाळा; सुनील मानेंचा गंभीर आरोप

    Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मुंबईतील ओव्हरहेड केबल व डक्टविषयी निवेदन करताना कंपन्यांकडून महापालिकेत खोदाई आणि पुनर्स्थापना शुल्क नियमानुसार घ्यावे, असे सांगितले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    pune MC

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : महापालिकेत २६ हजार कोटी रुपयांचा केबल डक्ट घोटाळा करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराबाबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना अवगत करूनही त्यांच्याकडून कारवाई केली जात नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी शुक्रवारी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार यांना निवेदन देऊन, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

    ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मुंबईतील ओव्हरहेड केबल व डक्टविषयी निवेदन करताना कंपन्यांकडून महापालिकेत खोदाई आणि पुनर्स्थापना शुल्क नियमानुसार घ्यावे, असे सांगितले आहे. मात्र, पुणे महापालिकेने या भूमिकेच्या उलट निर्णय घेतला असून, त्यामुळे महापालिकेलेचे २४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे,’ असा आरोप माने यांनी केला.
    Nashik Crime: सासूमुळेच बायको नांदत नाही, लव्ह मॅरेज केलेल्या जावयाच्या डोक्यात शिजला कट, कार काढली अन्….
    माने म्हाले, ‘महापालिकेला वार्षिक सहा कोटी रुपयांपैकी केवळ १० टक्के रक्कम म्हणजे दर वर्षी केवळ ६० लाख रुपये महसूल मिळणार आहे. या सहा कोटी रुपयांपैकी ९० टक्के रक्कम संबंधित कंपनी काढून घेणार आहे.
    Pune Crime : ‘हा मुलगा माझा नाही’, पतीच्या डोक्यात संशयाचं भूत, मुलाला घेऊन गेला, अन्… पुणे हादरलं
    मात्र, याकडे लक्ष देण्यासाठी महापालिका आयुक्तांना वेळ आणि इच्छा नाही; तसेच शहरामध्ये केबलचे बेकायदेशीर काम केल्याबाबत महापालिकेने नोटिसा दिलेल्या केबल कंपन्यांना १८०० कोटींचा दंड ठोठावणे आणि भूमिगत केबलसाठी २३ हजार कोटी शुल्क आकारणे अपेक्षित असताना, महापालिकेने ती माहिती लपवून एकूण २६ हजार कोटींचा गैरव्यवहार केला आहे.’

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed