• Tue. Jul 7th, 2026

    पनवेल बसस्थानकाचे काम लवकरात लवकर सुरू करा – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 19, 2025
    पनवेल बसस्थानकाचे काम लवकरात लवकर सुरू करा – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद




    मुंबई,दि. १९: पनवेल हे मुंबईच्या वेशीवरील वेगाने विकसित होत असलेले महानगर आहे. या महानगरातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता, येथे भव्य बसपोर्ट होणे काळाची गरज आहे. सन २०१८ पासून रखडलेला बसपोर्ट प्रकल्प  लवकर सुरू करण्यात यावे याकरिता  फेरनिविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

    विधानभवन येथे राज्यातील राज्य परिवहन विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी  आमदार विक्रांत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार विजय  देशमुख,आमदार दौलत दरोडा, एसटी महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन,मुख्य लेखाधिकारी तथा आर्थिक सल्लागार गिरीश देशमुख उपस्थित होते.

    सन २०१८ पासून रखडलेल्या पनवेल बसस्थानकासंदर्भात स्थानिक आमदार विक्रांत पाटील यांनीही हे काम तात्काळ करावे, अशी मागणी केली. तसेच नांदेड येथील सांगवी येथे मागील अनेक वर्षापासून बसस्थानक उभारावे ही मागणी लक्षात घेता स्थानिक प्रशासनाला तातडीने यावर कार्यवाही करण्याचे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. यावेळी नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी याबाबत प्रशासनाकडून प्राधान्याने या कामाला गती द्यावी अशी मागणी केली.

    मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील नवीन बस पोर्टचे काम गतीने करणे, सोलापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम गतीने करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती शेड उभारण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.

    यासंदर्भात वाढते शहरीकरण आणि शालेय विद्यार्थ्यी तसेच स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी काळानुरूप बसपोर्ट उभारण्यावर राज्य परिवहन विभागाने प्राधान्य द्यावे अशी मागणी शहापूरचे आमदार दौलत दरोडा व सोलापूरचे आमदार विजय देशमुख यांनी  केली.

    ०००

    संध्या गरवारे/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *