• Sat. Mar 7th, 2026
    ए कल्याणी उठ ना! कुटुंबाचा आक्रोश, तरुणीचा झोपेत मृत्यू; PM रिपोर्ट पाहून सगळ्यांनाच धक्का

    तरुण वयात हृदय विकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमामात वाढलं आहे. नाशिकच्या लासलगावात अशीच एक घटना घडली आहे. अवघ्या २८ वर्षांच्या तरुणीला झोपेतच हृदय विकाराचा झटका आला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नाशिक: तरुण वयात हृदय विकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमामात वाढलं आहे. नाशिकच्या लासलगावात अशीच एक घटना घडली आहे. अवघ्या २८ वर्षांच्या तरुणीला झोपेतच हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे तिची प्राणज्योत मालवली. तिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    लासलगावच्या टाकळी विंचूरमध्ये राहणाऱ्या कल्याण मोकाटेचा झोपेतच मृत्यू झाला. कल्याणी रात्री नेहमीप्रमाणे तिच्या खोलीत झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठलीच नाही. घरच्या मंडळींनी तिला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. पण तिनं कोणताच प्रतिसाद दिला नाही. कल्याणी कोणतीच हालचाल करत नव्हती. त्यामुळे कुटुंबियांना चिंता वाटू लागली. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
    Nagpur Violence: गाड्या ओढून नेल्या अन् पेटवल्या; पोलिसांनी आम्हालाच शिव्या दिल्या; नागपुरातील महिलांचा संताप
    कुटुबियांनी कल्याणीला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. त्यामुळे कुटुंबियांसह शेजाऱ्यांना धक्काच बसला. टाकळी विंचूरमध्ये राहणाऱ्या कल्याणीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आलं. त्यातून धक्कादायक उलगडा झाला.

    कल्याणी मोकाटे झोपत एका पाठोपाठ एक असे हृदय विकाराचे ३ झटके येऊन गेले होते. त्यामुळेच तिची प्राणज्योत मालवली. कल्याणीच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कल्याणीच्या घरात कोणालाच हृदय विकाराचा त्रास नाही. पण तरीही कल्याणीचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. उच्च शिक्षित असलेली कल्याणी अविवाहित होती. तिच्या निधनानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed