Nagpur Dispute between Two Group : नागपुरात दोन गटात राडा झाल्यानंतर दगडफेक, वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पोलिसांनी अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.
नागपुरातील घटनेनंतर पोलिसांनी काय सांगितलं?
दुपारी आंदोलन झालं होतं, त्यानंतर काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घातलेल्या समजुतीनंतर संपूर्ण प्रकरण शांत झालं होतं. मात्र त्यानंतर संध्याकाळी पुन्हा दोन गट समोरासमोर आले आणि मोठा राडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय लहानशा गल्लीमध्ये दोन गटातील लोक समोरासमोर आले. जाणूनबुजून ही जाळपोळ, दगडफेक करण्यात आली आहे. यात काही पोलीस जखमी झाले आहेत.
Virar News : झाडाझुडपात पडलेल्या पिशवीत महिलेचं डोकं, धड वेगळं; विरारमधील घटनेचं गूढ उकललं
संध्याकाळी काही लोक नमाजसाठी जमा झाले होते. ते नमाजनंतर पुन्हा एकत्र आले. तसंच दुसऱ्या गटातील लोकही जमा झाले होते. दोन्ही गट यावेळी समोरासमोर आले.
Raigad News : शिमग्याचा कार्यक्रम आटोपून निघाले, पण नियतीच ठरली निष्ठूर; दोघांवर काळाचा घाला, संपूर्ण गाव हळहळले
पोलिसांकडून सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे, की घटनास्थळी पोलीस हजर आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ नये, ज्या लोकांनी कायदा हातात घेतला, त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. मोठ्या संख्येने लोकांना ताब्यात घेतलं आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी अफवा पसरवली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांची एक सायबर टीम या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे. कोण, कोणत्या ग्रुपमध्ये काय टाकत आहे, असं काही आढळल्यास त्यावर सायबर टीम लक्ष ठेवून असून, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Nagpur News : कायदा हातात घेऊ नका, सायबर टीम लक्ष ठेवून, अफवा पसरवल्यास कारवाई होणार; नागपूर राड्यावर पोलिसांची प्रतिक्रिया
दरम्यान, शहराच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर, दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

