• Thu. Sep 17th, 2026

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून सुरू करावी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 17, 2025
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून सुरू करावी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

मुंबई, दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टी-1 व टी -2 टर्मिनल येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जून २०२५ पासून सुरू करण्याचे निर्देश, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभाग व अदानी समूहाच्या प्रतिनिधींना दिले.

विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड रिक्षासेवा सुरू करण्याबाबत तसेच नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या कामकाजाचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री गजानन किर्तीकर, परिवहन आयुक्त व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार, नाशिक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे  व्यवस्थापन अदानी समूहाकडे असून अदानी समूह व परिवहन विभागाच्या समन्वयातून येत्या दोन महिन्यांत  प्रिप्रेड रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात.

यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ प्रवासी सुविधा उपलब्ध होणार असल्याने विमानतळाचे व्यवस्थापन पहाणाऱ्या अदानी समुहाने परिवहन विभागाच्या सहकार्याने 1 जून पासून प्रिप्रेड रिक्षा सेवा सुरू  करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी सेवा सक्षम करण्यासाठी लवकरच मिनी बसेस उपलब्ध करून देणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग डोंगराळ, दुर्गम जिल्हा असून वाहतुकीसाठी एस टी बस हा एकमेव आधार आहे. त्यामुळे बस सेवा सुरळीतपणे चालू रहावी व प्रवाशांची गैरसोय टाळून त्यांना एसटी बसची सेवा मिळावी, यासाठी भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिनी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात. या मागणीला परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानक व बस गाड्यांच्या विविध अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

पुढील एक महिन्यात नाशिकचे मेळा बसस्थानक समस्यामुक्त करावे

नाशिक शहरातील एसटी महामंडळाच्या समस्यां बाबतीत आमदार देवयानी फरांदे यांनी निवेदन सादर केले. प्रसाधनगृहे, बसस्थानक व परिसर स्वच्छता करुन नवीन बांधलेल्या मेळा बसस्थानक एक महिन्यांमध्ये समस्यामुक्त करावे असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. आमदार फरांदे यांच्या मागणीनुसार महामार्ग बसस्थानकाचा विकास सिंहस्थ निधीतून करण्याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात येईल. तसेच मेळा बसस्थानकाच्या समस्यांवरही सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

0000

मोहिनी राणे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed