Satish Bhosale Remanded Police Custody : मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फरार झालेल्या सतीश भोसलेला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली. सतीश भोसलेवर मारहाणीसह वन्यप्राण्यांची तस्करी आणि इतर २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फरार झालेल्या सतीश भोसलेला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली. सतीश भोसलेवर मारहाणीसह वन्यप्राण्यांची तस्करी आणि इतर २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जातीय राजकारणाचा बळी
बीडमध्ये सध्या जे काही जातीचं राजकारण सुरू आहे त्याचा सतीश भोसले हा बळी ठरला आहे. सतीश भोसले हा एका आमदाराचा कार्यकर्ता आहे. तो पारधी समाजाचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात आहे. एखाद्या मागासवर्गीयाने आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का? असे सतीश भोसले उर्फ खोक्याचे वकील अंकुश कांबळे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सतीश भोसले हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. गरीबांच्या पोरांना वह्या पुस्तके वाटप, उस तोड कामगारांना रेशन धान्य पुरवणे आणि गरिबांना मदत करणे अशी कामं सतीश भोसले करतो. त्याचे चांगले काम समोर आणले जात नाही. मात्र त्याच्यावरती खोटे आरोप केले जात आहेत.
वड्याचं तेल वांग्यावर
आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसलेवर काढला जात असल्याचा आरोप खोक्याच्या वकिलांनी केला. वड्याचं तेल वांग्यावर निघालं आहे. त्याचं घर उद्धस्त केलं गेलं. शुक्रवारी रात्री, होळीच्या दिवशी अज्ञात व्यक्तींनी सतीश भोसलेचं पाडलेलं घर पेटवून टाकलं. त्यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू जाळण्यात आल्या. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या महिलांना मारहाण केल्याचाही आरोप केला जात आहे.

