Eknath Shinde: आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा सातत्यानं सुरु आहेत. एकनाथ शिंदे सरकारच्या योजनांना यंदाच्या अर्थसंकल्पात फारसं स्थान देण्यात आलेलं नाही. शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरु केलेली आनंदाचा शिधा योजना बंद करण्यात आलेली आहे.
राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी असलेल्या समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्थान देण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. या समितीत मुख्यमंत्री आणि अर्थ आणि गृह खत्याचा पदभार असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा समावेश केला जातो. शिंदेंकडे अर्थ किंवा गृह मंत्रालय नाही. त्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठीच्या समितीत शिंदे यांचा समावेश केला जाऊ शकत नव्हता. पण शिंदे यांना समितीत स्थान देता यावं यासाठी नियमांमध्ये, निकषांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे समितीचं प्रमुखपद असेल, तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे समितीचं उपसंचालकपद असेल.
Uddhav Thackeray and Raj Thackeray: भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा! ‘बंधू मिलन’ कार्यक्रमाचं आयोजन, मुहूर्त ठरला!
गेल्याच महिन्यात महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समितीत उपमुख्यमंत्री शिंदेंचा समावेश करण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. या समितीतून पाच महिन्यांपूर्वी शिंदे यांचं नाव वगळण्यात आलं होतं. या समितीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समावेश होता. अजित पवारांकडे अर्थ मंत्रालय असल्यानं त्यांना या समितीत स्थान देण्यात आलं. या समितीत शिंदे नसल्यानं त्यांना डावलल्याची चर्चा रंगली. त्याबद्दल विचारलं असता, जिथे आपत्ती, तिथे एकनाथ शिंदे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्र्यांनी दिली. फडणवीस आणि शिंदे यांचे संबंध ताणल्याची चर्चा सुरु होताच नियमात सुधारणा करुन समितीमध्ये शिंदेंना स्थान देण्यात आलं.

