Pune Man Died in Mahabaleshwar : पुण्यातील तरुणांचा महाबळेश्वरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू
अक्षय म्हस्कू काळभोर (वय २६ ), सौरभ जालिंदर काळभोर (वय २६) ही अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर वैभव काळभोर, (वय २४ ) बजरंग पर्वतराव काळभोर (वय ३५, सर्व रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही जखमींना वाई येथील बेलर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Dausa News : रंग लावण्यावरुन वाद, लायब्ररीमध्ये तरुणासोबत असं काही घडलं की… होळीच्या दिवशी भयंकर घटना
लोणी काळभोर परिसरात फिरायला गेले आणि अनर्थ घडला
लोणी काळभोर परिसरातील चार मित्र दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर आज गुरुवारी, १३ मार्च रोजी पाच वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथून लोणी काळभोरकडे घरी निघाले होते. दरम्यान, वाई – पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट १०० मीटर दरीत कोसळली.
Pune News : आनंदाचा क्षण दु:खात बुडाला, पुण्यातील तरुणांसोबत महाबळेश्वरमध्ये अनर्थ घडला; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
यावेळी वाई पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांना वाई येथील बेलर या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षय आणि सौरभ काळभोर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर बजरंग पर्वतराव काळभोर आणि वैभव काळभोर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेलर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणांच्या या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चौघे मित्र फिरायला निघाले, पुन्हा घरी येताना नियतीने घात केला आणि आनंदाचा क्षण दु:खात बुडाला. पुण्यातील या दोन तरुणांच्या जाण्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

